Skip to content
Y
yTube.SITE v7.7.7
media / worlds / tools / internet oddities
YouTube / video information

जळगावच्या जामनेरमधल्या प्रस्तावित कोका-कोला प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

Video information, playback and saved actions.

जळगावच्या जामनेरमधल्या प्रस्तावित कोका-कोला प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

Description: जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर एमआयडीसीमध्ये हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचा सुमारे 1200 कोटी रुपयांचा बॉटलिंग प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे.

जामनेर तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना हा प्रकल्पाला पाणीपुरवठा करणं चुकीचं असल्याचं काही स्थानिकांचं म्हणणं आहे. प्रस्तावित Coca-Cola प्रकल्पासाठी दररोज 5 MLD म्हणजेच 50 लाख लिटर पाण्याची मागणी करण्यात आल्याचं MIDCच्या अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

प्रकल्पासाठीचं पाणी वाघूर धरणातून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं MIDCचं म्हणणं आहे. कंपनीने तापी नदीतूनही पाण्याची मागणी केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण अभ्यासकांचा प्रश्न आहे की, पाणीटंचाई असलेल्या भागात उद्योगासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी देणं कितपत योग्य आहे? प्रकल्पासाठी जमीन, पाणी, वीज, सांडपाणी आणि रोजगाराबाबत अधिक माहिती सार्वजनिक करावी, अशी त्यांची मागणी आहे.

तर जामनेरचे आमदार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाणीटंचाईचे आरोप फेटाळून लावत, या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं म्हटलं आहे.

2004 मध्ये केरळमधील प्लाचीमाडा इथे Coca-Colaच्या बॉटलिंग प्लांटविरोधात भूजल आणि पाण्याच्या वापरावरून आंदोलन झालं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्रातील जामनेरमध्ये प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पावरूनही पाणी आणि पर्यावरणाचा प्रश्न उपस्थित झालाय

रिपोर्ट- आशय येडगे
शूट- प्रज्वल भालेराव
एडिट- निलेश भोसले

बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi Close description
      
Videos related to "जळगावच्या जामनेरमधल्या प्रस्तावित कोका-कोला प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध"

Related videos are temporarily unavailable.

Try again, or come back later.